Header Ads Widget

Responsive Advertisement

* बच्चु भाऊ कडू व जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांचा वाढदिवशीचे रक्तदान शिबिर ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


* बच्चु भाऊ कडू व  जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांचा वाढदिवशीचे  रक्तदान शिबिर  ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कुरुल प्रतिनिधी: *प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने मां.ना. बच्चू भाऊ कडू यांच्या आणि पंडित साळुंके जिल्हा समन्वयक, प्रहार शेतकरी संघटना सोलापूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. त्यात माणेगाव मध्ये शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप करण्यात आले. लऊळ या ठिकाणी मोफत पशू चिकित्सा, लसीकरण शिबिर आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज वाकाव या ठिकाणी रक्तदान शिबिर , मोफत डोळे तपासनी शिबिर आणि शेतकऱ्यांना भाजी पाल्याचे बियाणेचे वाटप आज तालुका अध्यक्ष माढा तालुका अमोल केसरे यांच्या कडून आयोजन*करण्यात आले होते.

*आजच्या या रक्तदान शिबिरासाठी 55 जणांनी रक्तदान केले तसेच 60 जणांची डोळे तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के,जिल्हा समन्वयक पंडित साळुंके ,महावितरण चे अभियंता वैभव पळसकर , वांकाव चे ग्रां.प.सदस्य माणकोजी भुसारे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वाकाव चे सरपंच ऋतुराज सावंत लाभले होते. प्रहार शेतकरी संघटनेने  कायम समाजसेवा करण्याचा घेतलेला मा.ना. बच्चु भाऊ कडू यांचा वसा आयुष्यभर जपनार असल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांनी सांगितले.. तसेच सर्वसामान्य माणसाला अडचणीत एकटे न सोडण्याचे आश्वासन जिल्हा समन्वयक पंडित साळुंके  यांनी सांगितले. त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के, जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे , पत्रकार बाबासाहेब लोंढे, वाकाव ग्रां.प. सदस्य माणकोजी भुसारे, तालुका उपाध्यक्ष तानाजी मोटे , दादासाहेब तांबिले, जयंत मोटे,  शुभम सावंत, सोमनाथ भुसारे गणेश सुतार, किरण लवटे, प्रणित वाघमारे, मयूर चव्हाण, पांडुरंग आरे,तेजस भुसारे, औदुंबर भुसारे, विक्रम मुसळे, रणजित कोकाटे, विष्णु सुतार , अनिकेत साळुंके भारत भुसारे, सोमनाथ वायदंडे,  संतोष वीर असे मोठ्या *प्रमाणात , संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. -**
                मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)

             

Post a Comment

0 Comments