Header Ads Widget

Responsive Advertisement

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील सकमुर  येथील घटना.

       प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे  एका शेतकऱ्याचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना.  चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील सकमुर येथे घडली आहे. वारंवार तक्रार करुनही महावितरणाने कानाडोळा केल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबियांना मदत करा अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही असा इशारा दिला.

राजेश्वर तोहोगावकर (59) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथील रहिवासी होते. राजेश्वर यांच्या शेतातून गेलेले पोल वाकल्याने विद्युत तारा जमीनीवर आल्या. त्यांनी तीन महिन्यापुर्वी याप्रकाराची महावितरणाकडे तक्रार दिली.

नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तेथील विद्युत पुरवठा खंडीत केला होता. जमिनीवर विद्युत तार असले तरी त्यात प्रवाह नसल्याची माहिती शेतकऱ्यांना होती. दरम्यान शेतात आलेला बैल हाकलण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा याच ताराच्या विद्युत प्रवाहाने मृत्यू झाला. आज दुपारी तीन वाजता हा प्रकार समोर आला. अन गावकऱ्यांनी आक्रमक भूमीका घेत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला.


काल दुपारी या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ एकत्र आले. विद्युत प्रवाह बंद असतांना तो सुरू कसा झाला. वारवांर तक्रार देऊनही महावितरणने निष्काळजीपणा केला. त्यामुळं एका गरीब शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तातडीनं मृतकांच्या कुटुंबियांना मदत करा अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही असा इशारा दिला. घटनेची गंभीरता लक्षात घेता धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे घटनास्थळी दाखल झाले. विद्युत पोल सरळ करण्यासाठी तोहोगावकर यांनी महावितरण कडे तक्रार दिली होती.वारंवार पाठपुरावा केला. पण त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले गेले नाही. शेतात पसरलेल्या तारात विद्यूत प्रवाह नसतांना तो कधी सुरू केला. या संपुर्ण प्रकरणास महावितरण जबाबदार असून मृताच्या कुटुंबियांना मदत आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

                  

                        मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments