Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात परिस्थितीची पाहणी केली व प्रशासनाबरोबर चर्चा केली P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात परिस्थितीची पाहणी केली व प्रशासनाबरोबर चर्चा केली

गडचिरोली जिल्ह्यातील शिवनी या गावा लगत चामोर्शी रस्त्याच्या बाजूला बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महोदयंबरोबर चर्चा करताना त्यांनी पूरस्थिती बाबत विविध विषयांवर चर्चा केली

यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या व आजूबाजूच्या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यातील पाण्याच्या फुगवट्याबाबत वेळोवेळी सतर्कता बाळगण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत

ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही यावेळी त्यांनी प्रशासन व राज्य शासनाकडे केली

पूरस्थिती नंतर साथ रोग, रोगराई डेंगू अशा गोष्टींबाबत प्रशासनाने वेळीच काळजी घ्यावी पाणी निर्जंतुक करण्यासाठी सूचना द्याव्यात.

पूराच्या पाण्याच्या बाहेर असणारी घरे मात्र मुसळधार पावसामुळे अशा मातीच्या घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर त्यांनाही या नुकसान भरपाई मध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया राबवा

सध्या धरणांचे साठे सर्वच ठिकाणी पूर्ण होत आलेले आहेत जर अजून पाऊस पडला तर धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे यापुढेही पूर परिस्थिती निर्माण न होण्यासाठी परस्पर जिल्हे राज्यांमध्ये संपर्क ठेवा.

            मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments