Header Ads Widget

Responsive Advertisement

एटापल्ली तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना! -दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन आरोपी कोटवाल झाला फरार! P10NEWS

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

   एटापल्ली येथे  दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून आरोपी कोतवाल झाला फरार..

* माणुसकीला काळीमा फासणारी घटना!

एटापल्ली.25/7/2022

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील बुर्गी या गावात कोतवाल पदावर असलेल्या व्यक्तीने,बिस्कीट घेऊन देतो असे सांगून आपल्या दुचाकीवर अज्ञात ठिकाणी नेऊन एका दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजता च्या दरम्यान घडली.

आपल्या बालिकेवर अत्याचार झाल्याची माहिती आई-वडिलांना होताच त्यांनी लगेच एटापल्ली सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, बलिकेची गंभीर अवस्था बघून ताबडतोब गडचिरोली महिला व बाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु गडचिरोली महिला रुग्णालयात त्या बालिकेची प्रकृती पुन्हा गंभीर झाल्यामुळे महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा प्राथमिक उपचार करत तिला नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले .

अत्याचार झालेल्या बालिकेच्या शरीरातील आंतरिक भागात मोठ्या प्रमाणात जखम झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झालेली असून तिला पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया साठी नागपूर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिलेली आहे. फरार झालेला आरोपी चे नाव सुंदरसाई घिसू मडावी वय 30 वर्ष असून हा महसूल विभागात कोतवाल या पदावर कार्यरत आहे.


आरोपी फोटो लाल घेऱ्यात

तीन दिवस झाल्यावरही अजून पर्यंत फरार आरोपी पोलिसांना गवसलेला नाही,यामुळे पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


या बालिकेवर अत्याचार झाल्यामुळे या परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केलेली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाने दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्यामुळे लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे.

या घटनेचा तपास उप विभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या कडे सोपविण्यात आलेला आहे.तीन दिवसापासून फरार झालेल्या आरोपीला ताबडतोब शोध मोहीम राबवून त्याला अटक करून त्याला कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होताना दिसत आहे.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)


                 

Post a Comment

0 Comments