Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली मंडळ कार्यालयातील विजेच्या कडकडाट व प्रकाशाने कर्मचारी धास्तावले.(पंखे व लॅपटॉपचे विजेमुळे उडाले) p10news


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

गडचिरोली मंडळ कार्यालयातील विजेच्या कडकडाट व प्रकाशाने कर्मचारी धास्तावले.

पंखे व लॅपटॉपचे विजेमुळे बंद झाले, पुन्हा सुरू होत नव्हते. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.


गडचिरोली/दिं,13:- गडचिरोली जिल्ह्यातील मुख्यालया जवळील आय टी आय चौकाकडे गडचिरोली मंडळ कार्यालय परिसरात संततधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु आज दिनांक 13/07/2022 रोज बुधवारला ठिक 2 ते 2.30 वाजताच्या दरम्यान अचानक विजेचा जोरात कडकडाट आवाज आले व खुप मोठा विजेचा प्रकाश पडला.

यामुळे मंडळ कार्योलयातील पटवाडी व कर्मचारी खूप धास्तावले.तसेच त्यांच्या कार्यालयातील काही पंखे उडाले.व लॅपटॉप सुद्धा सुरू होत नव्हते.आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तसेच मंडळ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचुन आहे.यामुळे नागरिकांना व कर्मचाऱ्यांना जाण्या-येण्यास त्रास होत आहे.


                      मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)Post a Comment

0 Comments