Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई - बल्लारशाह साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सतत प्रयत्नामुळे सुरू अखेर मुंबई - बल्लारशाह साप्ताहिक सुपरफास्ट p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


Homeविदर्भअखेर मुंबई - बल्लारशाह साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सतत प्रयत्नामुळे सुरू

अखेर मुंबई - बल्लारशाह साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सतत प्रयत्नामुळे सुरू

◾बल्लारशाह - मुंबई ट्रेन क्र. 01127/01128 साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन येत्या 5 जुलै पासून सुरू


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सतत प्रयत्नामुळे अखेर मुंबई - बल्लारशाह - मुंबई ट्रेन क्र. 01127/01128 साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन येत्या 5 जुलै पासून सुरू होत आहे. यामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना थेट मुंबईला जाण्याकरिता मोठी सोय होणार आहे.


कोरोना काळापासून मुंबईला जाण्याकरिता थेट रेल्वे गाडी आजपर्यंत सुरु न झाल्याने जिल्ह्यातील विवीध क्षेत्रातील टसेच आम रेल्वे प्रवाशांना नागपूर किंवा वार्धा येथे जावून मुंबई करिता प्रवास करावा लागत होता. या नव्याने सुरू होते असलेल्या रेल्वेगाडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व अन्यत्र प्रवाशांना मोठी सोय झाली आहे.


सदर साप्ताहिक गाडी ही 5 जुलै रोजी मंगळवार लोकमान्य टिळक टर्मिनल येथून रात्री 21:45 वाजता निघून बल्लारशाह दरम्यान सादर रेल्वे गाडी ही प्रतीदिन करण्यासाठी तसेच या गाडीचा थांबा जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र आसलेल्या भांदक व गजानन महाराजांचे तिर्थक्षेत्र आसलेल्या भांदक व गजानन महाराजांचे तिर्थस्थान असलेल्या शेगांव येथे तसेच व्यापारी दष्ट्या महत्वपूर्ण आसलेल्या जळगांव व शिर्डी संस्थांनास नजिक आसलेल्या मनमाड रेल्वे स्थानकावर मंजूर करण्यासाठी हंसराज अहिर यांनी मुख्य महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांना पत्र दिले आहे. ही रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस एम टी येथून सुरू व्हावी या हंसराज अहिर विशेषत्वाने प्रयत्नशील आहेत. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर महानगर व जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना कोरोना काळापासून थेट मुंबई करिता गाडी उपलब्ध झाल्याने झेडआरयुसीसी सदस्य दामोदर मंत्री व श्रीनिवास सूंचुवार यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री रमणीभाई चव्हाण, दामोधर मंत्री, डॉ.भुपेश भरमे, डॉ.सुशिल  मुंधडा,महाविर मंत्री, प्रभाकर मंत्री, सुनिल भट्टड, रमेश बोथर, रमाकांत देवडा,अनिश दिक्षित, जगदीश जाधवाणी,नरेश लेखवाणी, प्रदीप महेश्वरी, संजय मंघानी,आशिष मुंधडा, अशोक रोहरा,राजेश सादराणी,शाम सारडा, प्रहलाद शर्मा, नरेंद्र सोनी, पूनम तिवारी, प्रमोद त्रिवेदी आदिनी सदर गाडी सुरू केल्याबद्दल हंसराज अहिर यांचे आभार मानून त्यांचे या लोकाभिमुख काया॔बद्दल अभिनंदन केले आहे.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                           (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments