Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत. P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

5 ते 6 प्रवासी असणारा एक ट्रक पेरमीली नाल्यावरून काल रात्री अंदाजे 9.30 ते 10 वाजेदरम्यान वाहून गेल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली आहे. सकाळी त्या ट्रक मध्ये एकूण 3 मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त असून स्थानिक SDRF व पथक मार्फत शोधमोहीम सुरू करण्यात येत आहे.

प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत.

[7/10, 9:50 AM] +91 75887 72811: *जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली*

*जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल*

*दिनांक : 10.07.2022, सकाळी: 9.30 वा.*

-------------

*1. वैनगंगा नदी* : 

# संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 10 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.

# गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 5 गेट उघडलेले असुन एकूण 709 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. 

🟡गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्यामुळे पुढील काही तासात धरणाचा विसर्ग *1500 ते 2000 क्युमेक्स* पर्यंत वाढविण्यात येईल तरी नदीकाठी गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी.

# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 2989 क्युमेक्स आहे. 

#नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी, वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे, सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. 


*2. वर्धा नदी* :

# उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 13 पैकी 13 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. 

# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 7 गेट उघडलेले असुन विसर्ग 186 क्युमेक्स आहे. 

# वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. 


*3. प्राणहिता नदी* : 

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 2.00 मीटर ने खाली* आहे. 


*4. गोदावरी नदी* :

# लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 65 गेट उघडलेले असुन विसर्ग 17,811 क्युमेक्स (6,29,000 क्युसेक्स) आहे. 

🟡 *गोदावरी व प्राणहिता नदी च्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढत असल्याने बॅरेज मधून विसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

# सद्यस्थितीत कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 1.50 मीटरने खाली* आहे. 


*5. इंद्रावती नदी* :

# नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे, सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. 

🟡# *पर्लकोटा* नदीची पाणी पातळी पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊसामुळे  भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वाढलेली असून  *इशारा पातळीच्या वर* आहे. सद्यस्थितीत नदीची पाणी पातळी पुलाच्या 1.00 मीटरने खाली आहे. *इंद्रावती नदीची पाणी पातळी वाढलेली असल्याने बॅकवॉटरमुळे पर्लकोटा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे तरी नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी.*

---

[7/10, 10:59 AM] +91 75887 72811: आलापल्ली भामरागड राष्ट्रिय महामार्ग क्रमांक १३०डी वर आलापल्ली पासून २.५ की.मी. मोरीच्या वरून पाणी वाहत असल्यामुळे ये जा करणल्या नागरिकांनी आपले वाहन तथा पायी  रस्ता पार करू नये.

[7/10, 12:05 PM] +91 75887 72811: आलपल्ली ते सिरोंचा रस्ता मोसम गावचे पुढे नंदीगाव येथे  नाल्यावरून  पाणी जात असलेने वाहतूक बंद आहे

                    मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                    (EDITOR IN CHIEF)



Post a Comment

0 Comments