Header Ads Widget

Responsive Advertisement

नक्षली बॅनर लावताना तीन नक्षल (एक MBBS डॉक्टरचा हात असल्याने त्याला अटक) समर्थकांना अटक -10 दिवसांची पोलीस कोठडी P10NEWS


 सदर च्या घटनेत एक MBBS डॉक्टर (मेडिकल ऑफिसर) चा हात असल्याने व त्याला अटक झाल्याने जनतेला कुतूहलाचा विषय वाटत आहे

      
गडचिरोली/दिनांक,30:-दिनांक २८ जुलै ते ०३ ऑगस्ट या दरम्यान नक्षलवाद्यांकडून नक्षल शहीद सप्ताह पाळण्यात येतो. या दरम्यान नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. या नक्षल शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी मा.पोलीस विभाग कसोशीने प्रयत्न करीत असते .


पोलीस उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीत मा. पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय सुत्राच्या विश्वसनिय माहितीच्या आधारे रेपनपल्ली परिसरात उपपोस्टे रेपनपल्लीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवितांना दि. २८/०७/२०२२ रोजीचे रात्रौ दरम्यान उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापूर दामरंचा जाणाऱ्या मेन रोडवर
आरोपी क्र.
१) पवनकुमार फकीरचंद उईके (मेडिकल ऑफिसर) रा. कमलापूर, ता. अहेरी जि. गडचिरोली
२) प्रफुल देवानंद बट रा. वरूड ता. मारेगाव जि. यवतमाळ
३) अनिल गोकुळदास चट रा. कमलापूर ता. अहेरी जि. गडचिरोली.
हे २८ जुलै नक्षल शहीद सप्ताहादरम्यान आजुबाजुच्या परिसरात दहशत निर्माण करण्याकरीता भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या भा.क.पा. माओवादी संघटनेचे नक्षल बॅनर लावून शासनाविरुद्ध कट रचतांना मिळून आले. यावरून नमुद आरोपी विरुध्द उपपोस्टे रेपनपल्ली येथे अ.प.क्र. ०२/२०२२ कलम १२० (ब) ३४ भादंवि सहकलम बेकायदेशीर प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम १०,१३२० मपोका कलम १३५ अन्वये दिनांक २८/०७/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून, सदर तिन्ही आरोपीतांना दि. २८/०७/२०२२ रोजी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांना आज दिनांक २९/०७/२०२२ रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचेसमोर हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक- ०८/०८/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.

सदर घटनेचा पुढील तपास गड़चिरोली पोलीस दल करीत आहे.

सदर च्या घटनेत एक MBBS डॉक्टर (मेडिकल ऑफिसर) चा हात असल्याने व त्याला अटक झाल्याने जनतेला कुतूहलाचा विषय वाटत आहे .
          
             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments