Header Ads Widget

Responsive Advertisement

BREAKING NEWS : अखेर शिंदे सरकारने दिली , पेन्शन विधेयकाला मंजुरी . P10NEWS

 


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

BREAKING NEWS : अखेर शिंदे सरकारने दिली , पेन्शन विधेयकाला मंजुरी .

Bymarathisanhita

 JUL 17, 2022  पेन्शन विधेयक, पेन्शन विधेयक मंजुरी, राज्य शासन निर्णय


Spread the love

महाराष्ट्र राज्य शासनाकडुन पेन्शन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे .सदर पेन्शन विधकानुसार , 30 कोटींचे पेन्शन विधेयक सादर करण्यात आलेले होते .व किमान निवृत्तीवेतन हे 50 हजार रुपये निश्चित करण्यात आलेले होते .सदर विधेयकास शिंदे सरकारकडुन मंजुरी देण्यात आली आहे .याबाबतच्या विधेकाविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे पाहुयात .


राज्यातील माजी आमदार व माजी मंत्री यांना निवृत्तीवेतन अदा करणेबाबतच्या विधेयकाला शिंदे सरकारकडुन मंजुरी देण्यात आली आहे .सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 653 माजी मंत्री आणि आमदार आहे . हे 653 माजी आमदार व माजी मंत्री यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे .यासाठी शिंदे सरकारकडुन 30 कोटी रुपयांच्या निधी तरतुदीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली आहे .सदर विधेयकानुसार किमान निवृत्तीवेतन हे 50,000/- निश्चित करण्यात आलेले आहेत .सदर विधेकानुसार जे माजी आमदार एकदाच निवडुन आलेले आहेत .अशा माजी आमदारांना 50 हजार रुपये किमान पेन्शन निश्चित करण्यात आली आहे .


त्याचबरोबर जे माजी आमदार जेवढ्या वेळेसे निवडुन आलेले आहेत .अशा प्रमाणात निवृत्तीवेतनात वाढ होणार आहे .यासाठी माजी आमदार व माजी मंत्री यांना हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे .सदर विधेयकाला मंजुरी दिल्याने राज्य शासनाच्या तिजोरीवर सुमारे 30 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे .

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments