Header Ads Widget

Responsive Advertisement

*🏥मानेवाड्यात रोगनिदान शिबिर संपन्न*कार्यक्रमाचे उद्घाटक- बसपा नेते उत्तम शेवाळे नागपूर


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


 *🏥मानेवाड्यात रोगनिदान शिबिर संपन्न* 

🚑मानेवाड्यातील संयुक्त जयंती उत्सव समिती व इंगळे स्पेशालिटी क्लिनिक च्या संयुक्त विद्यमाने अत्तदीप बुद्ध विहारात आज रोग निदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व निशुल्क चष्मे वाटप शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केले. 


🚑याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ ह दा कांबळे, हृदयरोग तज्ञ डॉ शुभम इंगळे, बालरोग तज्ञ डॉ हिना गजभिये, डॉ भूषण गजभिये, दिनेश गोडबोले, आशय निमसरकार, ग्रोशिल टेभुरणे, रिया कोहळे, ऋतुजा हरणखेडे, गुंजन कापसे, अवंतिका वाडेकर, प्रिया महामल्ला, हैदर अन्सारी, अभिषेक काटरपवार आदींनी रोगनिदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी करुन गरजूंना निशुल्क चष्मे वाटप केले. 


👩‍👩‍👧‍👦शिबिराचा लाभ मानेवाडा, अमर नगर, विज्ञान नगर, विणकर वसाहत, अत्तदीप नगर आदि नगरातील नागरिकांनी घेतला. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी आयोजक शंकर थुल, प्रेम पाटील, सिकंदर सेलूकर, भीमराव कांबळे, विपुल गजभिये, निर्मला वडे, किशोर फुलमाळी, रमेश रंगारी, मनोरंजन फुलझेले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

                  मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                          (EDITOR IN CHIEF)
Post a Comment

0 Comments