मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
*--: मौजा-आलापल्ली ग्रामपंचायत विशेष :--*
मौजा-आलापल्ली ग्रामपंचायतचे राज्य जन माहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी *मा.यशवंत मस्के* यांचेकडे,दि.14 जुन 2022 च्या माहितीच्या अर्जान्वये *आदिवासी उत्सव समिती,* आलापल्लीने,वार्ड क्र-1 मधील भूखंड क्रमांक -80,सरकारी आबादी या एकूण जमिनी पैकी काही जमीन ही 7 ते 8 वर्षांपासून ताब्यात घेऊन त्या ठिकाणी *क्रांतीसुर्य बिरसा मुंडा* यांचे पुतळा उभारलेला असून त्याची नोंद ग्रामपंचायतला घेऊन,त्या विषयाचे नमुना-8 मिळणे करिता ग्रामपंचायतला अर्ज दिलेला होता.तो मंजूर होऊन त्याची सभेच्या कार्यवृत्तात नोंद घेण्यात आलेली आहे.परंतु आज जवळपास-1 वर्षाचा कालावधी झालेला असतांना,वारंवार मागणी करूनही *आदिवासी उत्सव समितीला* नमुना-8 देण्यात आलेला नाही.त्या विषयी माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागितली असता,त्या संबंधाने निर्धारित कालावधी होऊन ही मा.ग्रामविकास अधिकारी *यशवंत मस्के* हे हेतूपुरस्परपणे माहिती देण्यास टाळाटाळ करित आहेत.हे माहितीचा अधिकार अधिनियम- 2005 तथा दप्तर दिरंगाई अधिनियम-2005 चे स्पष्टपणे उल्लंघन असून या करिता सर्वस्वी *मा. यशवंत मस्के* हे जबाबदार आहेत.करिता त्यांचे विरुद्ध सदर माहिती मिळणे करिता मा.प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पंचायत),पंचायत.समिती.,अहेरी यांचेकडे प्रथम अपिल दाखल करण्यात येत आहे...
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. (EDITOR IN CHIEF)
0 Comments