Header Ads Widget

Responsive Advertisement

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा P10NEWS

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

गडचिरोली/दि.26: सध्या मान्सुन कालावधी सुरु असुन गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मूसळधार पावसामुळे जलसंपदा विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प, गडचिरोली शहरातील गडचिरोली मा.मा. तलाव व इतर तालुक्यातील लघु तलाव असे जिल्ह्यातील एकूण 20 प्रकल्प 100 टक्के भरलेले असून काही लघु तलाव 90 टक्के पेक्षा जास्त भरलेले आहे. 

प्रकल्प/ तलाव पाहण्याकरीता पर्यटक/स्थानिक नागरीक यांची ये-जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्प 100 टक्के भरल्याने वेळोवेळी येणाऱ्या पावसामुळे सांडव्यावरुन विसर्ग कमी-जास्त प्रमाणात प्रवाहीत होत असतो. तेव्हा यासंदर्भात उचित सतर्कता बाळगण्याचे दृष्टीने प्रकल्पाच्या/तलावांच्या काठावरील नागरीकांनी तसेच पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी असे गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

                   मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                         (EDITOR IN CHIEF)


                                                                  ****

Post a Comment

0 Comments