Header Ads Widget

Responsive Advertisement

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)
 

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन

गडचिरोली/दि.14:  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली तर्फे दिनांक 15 जुलै 2022 रोजी ऑनलाईन दु.12.30 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात ड्राईव्हिंग क्षेत्रातील महिलांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीबाबत चेतन पाटील, मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली हे ऑनलाईन मार्गदर्शन  करणार आहेत. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरिता दु.12.30 वाजता meet.google.com/fgb-kmnv-pit या लिंकवर जाईन करावे असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.


             मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR In CHIEF)


Post a Comment

0 Comments