Header Ads Widget

Responsive Advertisement

*सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस, सिरोंचात तीनशे टक्के पावासाची नोंद*. *1 जुन पासून सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या पावसाची आकडेवारी* – P10NEWS


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

*सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस, सिरोंचात तीनशे टक्के पावासाची नोंद*


1 जून पासून जिल्हयात सरासरीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. 19 जुलै पर्यंत 473.2 मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. परंतू यावर्षी दुप्पट म्हणजेच एकुण 855 मिमी पाऊस झाला. मागील वर्षी मात्र आज रोजी पर्यंत फक्त 407.9 मिलिमीटर म्हणजेच 86.2% पाऊस झाला होता. यावर्षी सर्वात जास्त पाऊस 1280 मिमी सिरोंचा, 1134 मिमी अहेरी तर भामरागड 1055 मिमी नोंद झाली. गडचिरोली जिल्हयातील सरासरी पावसाची आकडेवारी पाहिल्यास जुलैच्या शेवटी व ऑगस्टमधे पावसाचे प्रमाण जास्‍त असते. मात्र यावळी आताच वार्षिक सरासरी 1254.1 मिमी च्या 68 टक्के पाऊस जिल्हयात पडला आहे. सिरोंचामधे वार्षिक सरासरी पुर्ण करून 116 टक्के पाऊस आताच झाला. त्या पाठोपाठ अहेरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडला आहे. 


*1 जुन पासून सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या पावसाची आकडेवारी* –

(तालुका नाव - 1 जून ते 19 जुलै पर्यंत पडणारा सरासरी पाऊस - या वर्षी 19 जुलै पर्यंत पडलेला पाऊस व टक्केवारी या क्रमाने –मिमी मधे)

गडचिरोली – 547.4 - 832.6 - 152.1 टक्के

कुरखेडा – 563.0 – 710.9 – 126.3 टक्के

आरमोरी – 456.7 – 745.1 – 163.1 टक्के

चामोर्शी – 364.3 – 727.5 – 199.7 टक्के

सिरोंचा – 402.0 – 1280.0 – 318.4 टक्के

अहेरी – 474.2 – 1134.9 – 239.3 टक्के

एटापल्ली – 520.3 – 799.9 – 153.7 टक्के

धानोरा – 591.7 – 631.8 – 106.8 टक्के

कोरची – 552.4 – 747.3 – 135.3 टक्के

देसाईगंज – 502.0 – 737.9 – 147.0 टक्के

मुलचेरा – 470.8 – 861.6 – 183.0 टक्के

भामरागड – 491.8 – 1057.5 – 215.0 टक्के

जिल्हा एकुण – 473.2 – 855.6 – 180.8 टक्के

              

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                       (EDITOR IN CHIEF)



Post a Comment

0 Comments