Header Ads Widget

Responsive Advertisement

सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या, पुण्याच्या SRPF जवानाचं गडचिरोलीत टोकाचं पाऊल p10newsमंदीप एम. गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)


सहकाऱ्यावर गोळी झाडून आत्महत्या, पुण्याच्या SRPF जवानाचं गडचिरोलीत टोकाचं पाऊल

राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यातील बॅरकमध्ये ही घटना घडली आहे.

हायलाइट्स:

गडचिरोलीमधील पोलीस मदत केंद्र (मरपल्ली) येथे धक्कादायक प्रकार

अंतर्गत वादातून सहकाऱ्यावर गोळीबार

एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड कराAdv: समर सेल - फॅन आणि एअर कुलर्सवर मिळवा ६० टक्क्यांपर्यंत सूट


Subscribe to Notifications

पुणे : राज्य राखीव दलाच्या जवानाने (SRPF Jawan Firing) अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार करुन स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली (Gadchiroli) येथील मरपल्ली येथे ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. वैयक्तिक वादातून जवानाने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गडचिरोलीसह पुण्यात (Pune) खळबळ उडाली आहे.


नेमकं काय घडलं?


राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने सहकाऱ्याची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यातील बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. पुण्याहून हे दोन्ही जवान गडचिरोलीमधील पोलीस मदत केंद्र (मरपल्ली) येथे तैनात होते. राज्य राखीव दलाच्या जवानांमधील अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.हेही वाचा : तिकीट बूक झालं, पण कुटुंबाची भेट अधुरी, वर्ध्याच्या BSF जवानाचा संशयास्पद मृत्यू


पुण्याच्या जवानाचं टोकाचं पाऊलजवानाने आपल्या रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दोघा जवानांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. श्रीकांत बेरड आणि बंडू नवतरला अशी आहेत मयतांची नावे आहेत. दोघेही पुण्यातील दौंड येथील एसआरपी कॅम्पचे जवान होते. या प्रकारामुळे गडचिरोलीतील एसआरपी कॅम्पमध्ये खळबळ माजली आहे.


हेही वाचा : बायकोची हत्या करुन तलावात फेकलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर नवऱ्याला पाच महिन्यांनी बेड्या

रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.


हेही वाचा : वडिलांसोबत भांडणाचा जाब विचारला, तरुणाला दगडाने ठेचून धारदार शस्त्राने वार


    

संबंधित बातम्या

मोबाईल चार्जिंगचा वाद, मध्यस्थी केल्याने हत्या, अडीच महिन्यांनी मुख्य आरोपी सापडला

तिकीट बूक झालं, पण कुटुंबाची भेट अधुरी, वर्ध्याच्या BSF जवानाचा संशयास्पद मृत्यू

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच सीआरपीएफ जवानाने झाडली स्वत:वर गोळी

bsf jawan opens fire : जवानाच्या बेछुट गोळीबारात ४ जणांचा मृत्यू, स्वतःवरही गोळी झाडली

बायकोची हत्या करुन तलावात फेकलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर नवऱ्याला पाच महिन्यांनी बेड्या

महत्वाचे लेख


गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू !

या बातम्यांबद्दल अधिक वाचा

हत्या आणि आत्महत्याजवानाची हत्यागोळीबार करुन हत्याएसआरपीएफ जवानSRPF JawanPune 

गडचिरोली : राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर केला गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) घडली आहे. एकमेकांवर गोळीबार केलेले हे दोन्ही जवान पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे तैनातीस होते. दोघांच्या वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


हे देखील पाहा -

या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून दोघंही दौंड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते. घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आलं आहेत.

अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्रात घडली घटना.

घटनेची माहिती कळताच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या दोन जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.                                             घटनेचा पुढील तपास जिमलगटा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments