Header Ads Widget

Responsive Advertisement

Photos: बंडानंतर चर्चेत आलेले सचिन जोशी कोण? जाणून घ्या एकनाथ शिंदेच्या खासगी सचिवांबद्दल p10news

बंडानंतर चर्चेत आलेले सचिन जोशी कोण? जाणून घ्या एकनाथ शिंदेच्या खासगी सचिवांबद्दल

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३८ झाली आहे तर नऊ अपक्षांसह एकूण ४७ आमदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत.

June 25, 2022 11:38:25 am

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मंगळवारपासून एकानंतर एक शिवसेना आमदार शिंदे गटात जाऊन दाखल होत आहे.


Shivsena Eknath Shinde Sachin Joshi Personal Secretary Photos
2/18
गुरुवारी शिवसेनेचे पाच आमदार गुवाहाटी दाखल झाल्यानंतर शिंदे गटाने आपल्याकडे आलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांची आणि नऊ अपक्ष आमदारांची यादी जाहीर केली होती.
शुक्रवारी शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि शिंदे गटात दाखल झाले.


त्यामुळे आता गुवाहाटीत शिंदे यांच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३८ झाली आहे तर नऊ अपक्षांसह एकूण ४७ आमदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत.

या सर्व घडामोडी नंतर शुक्रवारी आपल्याला आवश्यक असलेले संख्याबळ पूर्ण झाले असल्याचा आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात हवे असलेले बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.



पण त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी आहेत.
शिंदे यांच्या राजकीय प्रवासात जोशी हे त्यांच्या समवेत अगदी सुरुवातीपासून राहिले आहेत.
शिंदे यांच्याकडे मोठ्या राजकीय जबाबदाऱ्या जशा येत गेल्या तसे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे काम जोशी यांच्याकडे आले.
शिंदे आणि माध्यमांमधील दुवा म्हणून जोशी कार्यरत असत.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात सचिन जोशी यांचे मंत्रालय कामकाजातील महत्व कमालीचे वाढल्याचे स्पष्ट दिसत होते.
शिंदे यांचे प्रशासकीय सचिव म्हणून बालाजी खतगावकर यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असली तरी प्रशासकीय नियुक्त्या, शिंदे यांची स्थानिक राजकारणातील आर्थिक गणिते, राजकीय आखणीला मूर्त स्वरुप देण्यात सचिन जोशी यांची भूमिका निर्णायक ठरु लागली होती.
धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर सव्वामहिना जोशी ‘नॉट रिचेबल’ झाले.
जोशी गावी गेले आहेत, फिरण्यासाठी गेले आहेत, साहेबांच्या कामानिमित्त बाहेर आहेत अशा चर्चा राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात सातत्याने सुरू होत्या.

केंद्रीय तपास यंत्रणांचे त्यांच्यावर लक्ष असल्याच्या चर्चाही अगदी जोमात सुरु झाल्या होत्या.

शिंदे यांचे सुरतेतील बंड आणि पुढे गुवहाटीपर्यंतचा प्रवास सुरु होताच जोशी यांच्या मागील महिनाभरापासून ‘गायब’होण्यामागील अर्थ आता अनेकांना उलगडू लागला आहे.

अर्थात इतके सगळे सुरु असतानाही जोशी मात्र अद्याप अनेकांसाठी ‘भूमिगत’च आहेत हे विशेष !
          
     
                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                            (EDITOR IN CHIEF)

Post a Comment

0 Comments