Header Ads Widget

Responsive Advertisement

मागासवर्गीय दांपत्यांसाठी कन्यादान योजना p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


मागासवर्गीय दांपत्यांसाठी कन्यादान योजना


गडचिरोली/दि.16: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि. 18 डिसेंबर 2008 नुसार ‘‘सामुहीक विवाह सोहळयामध्ये भाग घेऊन विवाह करणा-या मागासवर्गीय दांपत्यासाठी कन्यादान योजना ’’राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सामुहीक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणा-या मागासवर्गीय (अनु.जाती व विजाभज ) पात्र दांपत्यास प्रति जोडपे रु. 20,000/- इतके आर्थिक सहाय्य करण्यात येते. तसेच सेवाभावी संस्था/शासकीय प्रधिकरणे/जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयामध्ये केला जाणा-या खर्चासाठी प्रति पात्र जोडपे रु. 4,000/- अनुदान शासनाव्दारे देण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे.

वधु व वरांचे निकष:- वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असले पाहिजे,नवदांपत्यातील वधु/वर यापैकी दोन्ही किंवा एकजण हे अनुसूचित जाती व (नवबौध्दसह) विमुक्त जाती,भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील असावेत,वधु व वर यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय आहे,बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दांपत्या  /कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा.याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे आवश्यक आहे.वधु व वर यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे.

सामुहिक सोहळा आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्था/यंत्रणेचे निकष:-स्वयंसेवी संस्था/यंत्रण, स्थानिक नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वत अधिनियम 1850 अंतर्गत  नोंदणीकृत असावी. सामुहिक विवाहासाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था/यंत्रणा सेवाभावी असावी. तसेच केंद्र/राज्य शासकीय  स्वायता संस्था/शासकीय प्राधिकरणे/सार्वजनिक प्राधिकरणे/जिल्हा परिषद असावीत. संस्था/केंद्र/राज्यशासकीय स्वयता संस्था/शासकीय प्राधिकरणे/सार्वजनिक प्राधिकरणे/जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळयामध्ये केला जाणा-या खर्चासाठी प्रति पात्र जोडपे रु. 4,000/-  शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. सामुहिक विवाह सोहळयासाठी किमान 10 दांमत्ये असणे आवश्यक राहील.सेवाभावी संस्था/यंत्रणेने सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी झालेल्या मागासवर्गीय जोडप्यांची परिशिष्टाप्रमाणे माहिती/संबंधितांची छायाचित्रे विहीत नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे  विवाह संपन्न होण्याच्या किमान 15 दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाकडे सादर करावीत. 

वरील योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळे आयोजित करुन इच्छिणा-या सेवाभावी/शासकीय प्राधिकरणे यांनी अधिक माहिती करीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे  आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,गडचिरोली,यांनी केले आहे.

*****

Post a Comment

0 Comments