Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा परिषदा व पंचायत समिती, क्षेत्रफळाच्या दृष्टीने नव्याने प्रसिद्ध केलेल्या निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती प्रारुप प्रभाग रचना योग्य. ‌p10news

मंदीप एम.गोरडवार , मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

गडचिरोली जिल्हा परिषदा व पंचायत समिती, क्षेत्रफळाच्या दृष्टीने नव्याने प्रसिद्ध केलेल्या निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती, प्रारुप प्रभाग रचना योग्य.- ‌ मा.संजय मिणा जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे निर्णय योग्य.          

गडचिरोली/दिनांक,02/06/2022 रोजी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडील अधिसूचना रानिआ/जिपस/2021/प्र.क्र.का-7 दिनांक 10/05/2021 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम,1961(सन 1962 चा अधिनियम-5)चे कलम 58 चे पोट-कलम (1)(अ) अन्वये गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसुचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे गडचिरोली पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल.त्या निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करण्यात येत आहे.आणि ते निर्वाचक गण दर्शविणार-या आदेशाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.                           या.संजय मिणा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेला निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती क्षेत्रफळाच्या दृष्टीने योग्य आहे. कारण यापुर्वीची निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती ही राजकीय निवडणुकीत प्रचाराच्या दृष्टीने खुप गुंतागुंतीची होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील गावे ही कल्पने पलीकडील होती व ती गावे एका गणातील गावाच्या पलीकडील दुस-या गणात ती. पार करून त्या गावात प्रचाराकरिता जावे लागत होते.यामध्ये वेळ व पैसाचा उमेदवाराचा अपव्यय होत होता.उमेदवाराला प्रचाराला व  प्रशासनाला सुध्दा खुप त्रास होत होता.यामुळे मा.संजय मिणा जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेला निर्वाचक गणांची संख्या व त्याची व्याप्ती क्षेत्रफळाच्या दृष्टीने योग्य आहे.



Post a Comment

0 Comments