Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट p10news

 

मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट

By  P10 NEWS    Published: June 22, 2022 9:29 AM


Bhagat Singh Koshyari : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Open in App


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत असल्याने उद्धव ठाकरेंच्य नेतृत्वाखालील मविआ सरकार धोक्यात आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजभवन आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मात्र राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे आता राज्यपालांची अनुपस्थिती असेल तर सध्याच्या परिस्थितीत सरकारबाबतचा निर्णय कसा घेतला जाईल, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाणार आहेत. Post a Comment

0 Comments