Header Ads Widget

Responsive Advertisement

लगाम धान खरेदी केंद्र बाबत बातमीचा खुलासा*p10news


 मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

लगाम धान खरेदी केंद्र बाबत बातमीचा खुलासा*


 गडचिरोली/दि.06:  किमान आधारभुत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमंतीने (डिस्ट्रेस सेल)) धान्य / भरडधान्य विकावे लागु नये म्हणून ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थांमार्फत ((बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को -ऑप.मार्केटींग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ,नाशिक) राज्यात एफ.ए.क्यु ((Fair average quality) दर्जाच्या धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. किमान आधारभुत किंमत खरेदी योजना ही अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन ‍निर्णयाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते.

   किमान आधारभुत खरेदी योजना हंगाम 2020-21- मध्ये आ. वि. का. सह. संस्था.खरेदी केंद्र लगाम येथे दि. 18/12/2020 पासुन दि. 31 मार्च 2021 पर्यत एकुण पोती 144202 वजन 57680.60 क्विं. धान साधारन 'क प्रत ची खरेदी करण्यात आलेली होती व त्याची खरेदी रजिस्टर (MP-5)मध्ये नोंद घेण्यात आलेली आहे व खरेदी रजिस्टर अद्यावत आहे.  खरेदी  केलेल्या धानसाठयापैकी उप प्रा. का.अहेरी (उच्च श्रेणी) च्या डि. ओ. प्रमाणे आधारभुत खरेदी रजिस्टर अद्यावत आहे.हंगाम 2020-21 मध्ये आ.वि.का.सह.संस्था.लगाम येथे एकूण खरेदी केलेले वजन 57680.60क्वि.पोती 144202 पैकी एकूण पोती 136776 धानसाठा भरडाईस जावक करण्यात आलेला असुन जावक वजा जाता साठापुस्तकाप्रमाणे शिल्लक असलेला एकूण पोती 7426 खरेदी केंद्र. लगाम येथे प्रत्यक्षात शिल्लक दिसुन येत नाही. 

 आ.वि.का.सह. संस्था. लगाम यांनी किमान आधारभुत किंमत खरेदी योजना हंगाम  2020-21 करीता महामंडळाशी केलेल्या करारनाम्याप्रमाणे महामंडळाचे उप अभिकर्ता म्हणुन खरेदी केलेल्या धानसाठयाची सुयोग्य शास्त्रोक्त पद्धतीने साठवणुक व सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही संस्थेची आहे.संस्थेने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली नाही व कर्तव्यात कसुर केले आहे व आ. वि. का. सह. संस्था, खरेदी केंद्र, लगाम येथील शासनाचे एकूण वजन.  2970.40  क्विं पोती 7426 व त्यांची 1868/- प्रमाणे होणारी रक्कम 5548707/- रुपये व त्यावर प्रती क्विं. 700/- प्रमाणे होणारी बोनसची रक्कम 2079280/- रुपये अशी एकुणात रक्कम 7627987.20/- रुपयांच्या धानसाठयाची अफरातफर केल्याने  एल.जी.रामगोनवार,सचिव आ.वि.का.सह. लगाम संस्था समिती यांचेवर भा.दं.वि.कलम 406,409 व 34 अन्वये दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्टेशन ,अहेरी येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तसेच दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी कार्यालयास शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीमध्ये असे नमुद होते की, सन 2021-22 मध्ये तक्रारदार शेतकऱ्यांनी आ.वि.का.सह. संस्था. लगाम येथे धान विक्री केले व त्यांना धानाचे बिल देण्यात आले नाही, यामुळे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्वरीत प्रत्यक्ष चौकशी करून संस्था कमिटी व तक्रारदार शेतकऱ्यांचे बयान घेण्यात आले. 

आधारभुत खरेदी योजना हंगाम 2020-21 चे धान खरेदीचे संपुर्ण हिशेब आ.वि.का. सह.संस्था. लगामकडुन उप प्रादेशिक कार्यालय अहेरी (उच्च श्रेणी) येथे अप्राप्त असल्याने खरेदी केंद्र,लगाम हे आधारभुत खरेदी योजना हंगाम 2021-22 मध्ये सुरु करण्यात आलेले नव्हते व तसे कोणत्याही प्रकारचे आदेश उप प्रादेशिक कार्यालय अहेरी (उच्च श्रेणी) कडून आ.वि.का.सह.संस्था.लगाम यांना देण्यात आलेले नाही. तरीही एल.जी.रामगोनवार यांनी शेतकऱ्यांकडुन परस्पर धान घेऊन शेतकऱ्यांची फसवणुक करुन त्यांची आर्थिक फसवणूक सुदधा केली आहे. असे निदर्शनास आल्याने दि.28 जानेवारी 2022 रोजी पोलीस स्टेशन, अहेरी येथे एल.जी. रामगोनवार यांनी शेतकऱ्यांनी फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस चौकशी असुन दोषींवर कडक कारवाई होऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल ही अपेक्षा आहे.असे उप प्रादेशिक व्यवस्थाषपक अहेरी (उच्च श्रेणी)  बि.एस. बरकमकर यांनी कळविले आहे.

*****

Post a Comment

0 Comments