Header Ads Widget

Responsive Advertisement

एकनाथ शिंदे गट व शिवसेना , इतर पक्षांची अस्तित्वाची लढाई , p10news

   

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)


      एकनाथ शिंदे गट व शिवसेना , इतर पक्षांची अस्तित्वाची लढाई .

महाराष्ट्र/28:-महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आली.तेव्हा पासुन केंद्र सरकार व राज्य सरकार या़च्यामध्ये अंतर्गत सर्वश्रेष्ठ कोण ह्याची लढाई वारंवार राज्यातील जनतेला पाहायला मिळाली.

भाजप पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भ्रष्टाचार या मुद्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.व यामध्ये अनेक नेते बळी सुध्दा गेले.आणी काही नेते इडी आणि सिबिआय च्या भीती पोटी पक्ष सोडून गेले.किवा छुपी साधण्यात भलं समजून बाजूला झाले.

परंतु शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खंबीर पणे आपला किल्ला लढवण्याचा प्रयत्न केले.राजकारणात सर्व काही आलबेल असते.व सर्व काही चालतं हे त्याना माहिती आहे.व सर्वांच्या व्यक्तीक संबंध चांगले असतात.सर्व काही कालांतराने एकत्र येतात व जे काही घडामोडी होत असतात ते एकमेकांच्या सल्ल्याने होत असतात.

             शिवसेना जेव्हापासून भाजपला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षासोबत घरोबा करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन नवा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात घडविला.पण हे अपयश व अपमान भाजप पक्षाच्या व नेत्यांच्या जिव्हारी लागला.आणी तेव्हा पासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये शितयुध्द सुरू झाले.अनेक आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले.यामध्ये काही मागासवर्गीय नेते व अल्पसंख्याक नेते बळी पडले. अक्षरशः जेल सुध्दा भोगत आहेत.

अशीच एक लढाई भाजप ने इडीची चौकशीचा फेरा एकनाथ शिंदे यांच्या सचिव संजय जोशी कडे नोटीस गेला, अनिल परब यांना नोटीस व चौकशी सुरू आहे.अगोदरचं राष्ट्रवादी काँग्रेस चे दोन बडे नेते इडीच्या जाळ्यात अडकले.आपलाही गेम होत आहे.पाहुन एकनाथ शिंदे गटाने या सर्व प्रकाराला कसं तोंड द्यावे.व ओबीसी आरक्षण सुध्दा मुद्दा खटाटोप चालु होता.यावर बरेचं नेते नाराज होते. आणि लढाई करायची आहे.राष्ट्रवादी कांग्रेस कडुन वारंवार सरकारमध्ये सहभागी असुन सुद्धा अंतर्गत कोंडी होत होती.आणी भाजप पक्ष शिवसेना पक्षाला केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता.आणी सर्वांच्या नजरा मुंबई येथील महानगरपालिका जी एवढ्या मोठ्या पक्षाना केंद्रात व राज्यात सरकार असताना सुद्धा सत्ता काबीज करण्याची किमया जमली नाही.जी शिवसेनेच्या हातात आहे.महानगरपालीकेतुन शिवसनेचा अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता.

म्हणजेच शिवसेना व नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.एकनाथ शिंदे हे कट्टर समर्थक शिवसैनिक नेता म्हणून ओळखला जातो.त्याना व इतर आमदारांची होत असलेली कोंडी पाहावत नव्हती.व हा डाव शिवसेना करिता खेडण्यात आला.पण तो डाव त्यांच्यावरच उलटत असल्याचा दिसतं आहे.

         एकनाथ शिंदे गट व शिवसेना आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकतात की काय? याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या व राजकीय लोकांच्या नजरा आहेत.

     माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये केव्हाच असे विधान केले नाही की आपण शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना आम्ही बांधील आहोत.शिवसेना पक्षाच्या भविष्यात करिता होणाऱ्या धोक्यापासून सावध करण्यासाठी बंड आहे.तरि त्याना वारंवार बंडखोर घोषित करण्यात आले.ही अस्तित्वाची लढाई.

              मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                     (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments