Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा आरोग्य विभाग अहवालात पिण्यायोग्य पाणी -पाणी पिण्याचे आवाहन मुख्याधिकारी नगरपंचायत यांनी केले. P10NEWS

 


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


*नगर परिषद क्षेत्रातील सर्व नळ धारक नागरिकांना सुचना*


गडचिरोली/दि.23: नगर परिषद क्षेत्रातील सर्व नळ धारक नागरिकांना सुचित करण्यात येते की,  चामोर्शी रोडवरील 300 एम.एम.सी.आय.पाईप लाईन गोकुळ नगरमध्ये जाणारी 250 एम.एम.सी.आय. पाईप लाईन इतर डिस्टीब्युशन पाईप लाईन साफ करण्यात आली असून विर बाबुराव शेडमाके चौक, गोकुळ नगर, चनकाई नगर, आर्शिर्वाद नगर, गणेश नगर व इतर परिसरातील नागरिकांच्या घरगुती नळाचे पाणी नमुने तपासणी करीता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तपासणी अंती सदर पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याबाबत अहवाल  नगर परिषदेस प्राप्त झाला आहे. तरी सर्व नळ धारकांनी दिनांक 24 जून 2022 पासून पाण्याचा वापर पिण्याकरीता करावा असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

****.                         मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक                                          (EDITOR In CHIEF)


Post a Comment

0 Comments