Header Ads Widget

Responsive Advertisement

अहेरी तालुक्यात पेरमेलीतील अजब प्रकार:-बंधारा बांधकामासाठी नाल्यातील अवैध रेती उपसा.-जलसंधारण विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष p10news

   

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)

पेरमेलीतील अजब प्रकार:-बंधारा बांधकामासाठी अवैध रेती उपसा.-जलसंधारण विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष.

जलसंधारण विभागाचे काम बहुतेक निविदा काढून आंध्रप्रदेशातील कंत्राटदारांना बंधाऱ्याचे बांधकाम दिले असल्याची माहिती आहे.-यामध्ये प्रामुख्याने स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

गडचिरोली/पेरमिली/दिं:-12:-जंलसंधारण विभाग अंतर्गत अहेरी तालुक्यातील पेरमिली ,चंद्रा,व कुरुमल्ली,आदी तिनं गावालगतच्या नाल्यावर बंधारा बांधकामांचे काम सुरू आहे.एका बंधा-याच्या बांधकामासाठी अंदाजे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.बंधारा बांधकाम करिता टिपी ची रेती वापरने अपेक्षित होते.परंतु तसे न करता त्याच नाल्यातील शेकडो ब्रास रेतीचा नियमबाह्य वापर केला जात आहे.यासाठी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून सर्रासपणे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे.हा प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असतानाही महसूल व वनविभाग दुर्लक्ष करित आहेत.रेतीचा अवैध व नियमबाह्य वापर केला जात असतानाही महसूल विभागाचे दुर्लक्ष का? असा आरोप नागरिकांनी केला आहे.Post a Comment

0 Comments