Header Ads Widget

Responsive Advertisement

सुरजागड पहाडीवरून लोहखनिजाची ओव्हरलोड,भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात p10news


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR In CHIEF)


 वजनदार मंत्री व आमदारांच्या नातेवाईका कडे वाहतुकीची कंत्राटे?


याला चाप लावणार तरी कोण ?


गडचिरोली-एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिजाची वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड व भरधाव वेगाने जात असल्यामुळे एटापल्ली ,आलापल्ली-आष्टी मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रोज एक तरी ट्रक रस्त्याच्या कडेला अपघात ग्रस्त होऊन उभा असतो. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.19 जून च्या पहाटे आष्टी येथे आलापल्ली रस्त्यावर उभ्या वाहनाला लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून पहाटे फिरायला जाणाऱ्या चा जीव गेला नाही.


ड्रायव्हर दारू पिऊन बिनधास्त वाहने चालवत असतात.याला कारण अडविणारा कुणी नाही.कारण तर विदर्भातील एका कांग्रेसच्या बड्या मंत्र्याला व एका आमदाराच्या जावयाला याच्या वाहतुकीची कंत्राटे मिळाली. मग याना हात लावणार कोण?           ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण होत असताना व अपघातांची संख्या वाढत असताना वाहतूक विभाग व पोलीस प्रशासन यांच्यावर मेहेरबान आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाची पर्वा कुणालाच नाही काय असे वाटू लागले आहे.


नागरिकांच्या जीवनमरणाच्या या प्रश्नाकडे जिल्ह्यतील प्रसार माध्यमे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात याला कारण म्हणजे यांची झोळी दरमहा नित्यनियमितपणे भरली जात आहे.सत्तेचा आशीर्वाद यांच्या पाठीशी असल्यामुळे व जिल्ह्यतील खासदार आमदार मृग गिळून गप्प असल्याने आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही अशी भावना वाहतूक दारामध्ये झाली आहे.


शहराच्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत मुंग्याच्या रांगेप्रमाणे वाहने लागून असतात पण यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही याचे एकमेव कारण मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार,पोलीस प्रशासन, रोड वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन सर्वांची,प्रसार माध्यमे यांच्यावर सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रिवेणी अर्थ अँड मूव्हर्स कंपनी मेहेरबान आहे .

Post a Comment

0 Comments