Header Ads Widget

Responsive Advertisement

अबब! चक्क गडचिरोली शहरातील पाण्याच्या पाईप लाईन मध्ये मृतदेह.P10news

    

मंदीप एम गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
  

अबब! चक्क गडचिरोली शहरातील पाण्याच्या पाईप लाईन मध्ये मृतदेह. (मृतदेह असलेला पाणी शहरातील नागरिकांना पिण्याकरिता पुरवठा)       

प्रश्न चिन्ह पाईप लाईन मध्ये मृतदेह कसा ?               

   गावातली काही भिंती, आणि पाण्याच्या टाक्या रंगवून गडचिरोली शहराला स्वच्छ करून ठेवला असल्याचा देखावा, आज गडचिरोली शहरात चामोर्शी रोडवरील पाण्याच्या पाईप लाईन मध्ये मिळालेल्या मृतदेह बघून फोल ठरले असल्याचे विदारक वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे.


“जितना बडा ढोल, उतनी ही बडी पोल” ही म्हण,गडचिरोली नगर पालिकेच्या कार्यप्रणाली वरून सार्थ ठरलेली आहे.भिंती रंगवून आणि पाण्याच्या टाकीची रंगरंगोटी करून गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आपली पाठ थोपटून घेतली असून, आता यापुढे अजून कोणकोणते मोठे पराक्रम उघडकीस येतात यावर नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.

गडचिरोली शहरातील कोणत्याही पाण्याच्या टाक्या सुरक्षित नसून, कोणीही या टाक्यांवर बिनधास्त चढू वा उतरू शकतो.पाण्याच्या पाईप लाईन मध्ये मिळालेल्या मृतदेहाला बघून गडचिरोली नगर पालिकेने कोणत्याही पाण्याच्या टाकीची सुरक्षा केली नसल्याचे दिसून आल्याने संपूर्ण शहरातील नागरिकांनी नगर पालिकेच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


मिळालेला मृतदेह विवेकानंद नगर येथे राहणाऱ्या एका मतिमंद युवकाचा असल्याचे बोलले जात होते.

पाईप लाईन मध्ये मृत देह मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

 सहा वाजता च्या सुमारास सदर पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता,दोन अल्पवयीन मुले पाण्याच्या टाकी वर चढून आपल्या मोबाईल वर सेल्फी काढत टवाळक्या करतांना दिसून आले होते.याचा अर्थ असा होतो की,शहरातील कोणत्याही पाण्याच्या टाकीची सुरक्षा योग्य रीतीने करण्यात नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित निष्काळजीपणा केलेला आहे.

मागील तीन दिवसापासून मृतदेह बुडल्याने दूषित पाण्याचा पुरवठा संपूर्ण शहरात होत राहिल्याने हजारो लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाण्याच्या टाकीची सुरक्षा करण्यात चूक केलेल्या दोषी अधिकारी,आणि कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब कठोर कारवाई करण्याची मागणी गडचिरोली शहरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments