Header Ads Widget

Responsive Advertisement

*बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकर्‍यांनी 8806330909 या मोबाईलवर तक्रार करावी*p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


*बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकर्‍यांनी 8806330909 या मोबाईलवर तक्रार करावी*


खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके आदी विषयावर उद्भवणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यासाठी काळाबाजार आणि साठेबाजीला आळा बसवण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यरत राहणार आहे.



नियंत्रण कक्षात नेमलेल्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधून जिल्ह्यातील शेतकरी आपली तक्रार अडचणी नोंदवू शकतात. शेतकऱ्यांच्या तक्रारीची नोंद तक्रार नोंदवहीत घेतली जाईल. तसेच या तक्रारी संदर्भात संबंधित तालुका, पंचायत समिती कार्यालयात माहिती कळवली जाईल. त्यानंतर संबंधित विभाग त्यावर तत्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करतील, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली. आहे

खरीप हंगाम २०२२ मध्ये खते बियाणे आणि कीटकनाशका संदर्भात कृषी केंद्र व तत्सम ठिकाणी काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. शेतकऱ्यांना आपली तक्रार ८८०६३३०९०९ या क्रमांकावर नोंदवता येईल, असे सागर साळुंखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments