Header Ads Widget

Responsive Advertisement

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022 ची लेखी परीक्षा शांततेत पार पडली p10news

  

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF) 

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022 ची लेखी  परीक्षा शांततेत पार पडली

    गडचिरोली/19:-  गडचिरोली जिल्हा पोलीस भरती - 2022 च्या 136 जागांसाठी दिनांक-19/06/2022 रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा शांततेत व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलाने पार पाडली आहे.

             गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – 2022 करीता गडचिरोली जिल्हयातील एकुण 16848 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सदर लेखी परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली असुन, पहील्या टप्प्यात सामान्य क्षमता चाचणीचा पेपर सकाळी 11.00 ते 12.30 वा. व गोंडी भाषेचा पेपर दुपारी 2.30 ते 4.00 वा. घेण्यात आला. याकरीता गडचिरोली पोलीस दलामार्फत 1) शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली 2) शासकिय कृषी महाविद्यालय, आय. टी. आय. चौक गडचिरोली 3) पोलीस मुख्यालय, गडचिरोली 4)  शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदाळा गडचिरोली 5) आदिवासी इंग्रजी मिडीयम स्कुल, सेमाना रोड गडचिरोली 6) डॉ. नामदेवराव उसेंडी यांचे गोडावुन, एम आय डी सी मैदानाजवळ कोटगल रोड, गडचिरोली 7) वियानि विद्या निकेतन स्कुल, नवेगाव, गडचिरोली 8) शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली 9) कारमेल हॉयस्कुल, साईनगर, धानोरा रोड गडचिरोली 10) स्कुल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड, गडचिरोली 11) नामदेवराव पोरेड्डीवार इंजिनियरींग कॉलेज, धानोरा रोड गडचिरोली 12) सुमानंद सभागृह, आरमोरी रोड गडचिरोली 13) सुप्रभात मंगल कार्यालय, आरमोरी रोड गडचिरोली 14) प्लॅटिनम ज्युबली हॉयस्कुल, आरमोरी रोड गडचिरोली 15) शिवाजी हॉयस्कुल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर गडचिरोली 16) शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली अशा 16 परीक्षा केंद्राची व्यवस्था करुन, केंद्राच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्ताकरीता 2000 चे आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती -2022 पासुन कोणतेही उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावल्याचे दिसुन आले.

           सदर लेखी परीक्षा  मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा., यांचे नेतृत्वात पार पडली.

Post a Comment

0 Comments