Header Ads Widget

Responsive Advertisement

*राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम !18 जुलैला मतदान, 21 जुलैला मतमोजणी*p10news

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
     

*राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम !18 जुलैला मतदान, 21 जुलैला मतमोजणी*


दिल्ली/10:-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर भारताचे 15 वे राष्ट्रपती कोण होणार याबाबत सर्व देशवासीयाच्या मनात उत्सुकता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम आता जाहीर करण्यात आला आहे.



सीईसी श्री राजीव कुमार, निवडणूक आयोग श्री अनूप चंद्र पांडे यांच्यासमवेत भारताचे राष्ट्रपती कार्यालयाने दुपारी 3 वाजता निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचेकडून देण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments