Header Ads Widget

Responsive Advertisement

*प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी 13 जून पर्यंतची मुदत*p10news

 

मंदीप एम. गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)


*प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी 13 जून पर्यंतची मुदत*

*बीज निर्मितीपासून बाजारपेठ सुविधा निर्मिती पर्यंत विविध योजना*


गडचिरोली/दि.06:  सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 40% अनुदानावर तसेच अनुसूचित जाती,जमाती व महिला प्रवर्गाकरीता 60% अनुदानावर आधारीत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा फायदा घेण्याची संधी चालून आलेली आहे. इच्छुकांनी 13 जून पूर्वी आपले अर्ज सहायक आयुक्त,मत्स्य व्यवसाय, गडचिरोली येथून प्राप्त करुन त्याच कार्यालयात 13 जून रोजी सायंकाळी 5.00 वा.पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेत लाभार्थीभिमूख योजनांचा समावेश आहे. यात भूजलशयीन मत्स्य व्यवसाय व जलकृषि यांचा विकास करणे, शोभिवंत  मत्स्यपालन व पर्यटनांत्मक मत्स्य व्यवसायाचा विकास, मत्स्य व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापार, पायाभूत सुविधा व मासेमारीनंतरचे व्यवस्थापन  व बाजारपेठ आणि विपणन या पाच घटकांचा समावेश आहे. यातील विविध उपयोजनांचे तपशील राज्यशासनाच्या https://fisheries.maharashtra.gov.in/ व  http://nfdb.gov.in/guideline  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


लाभार्थ्यांस ज्या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्याबाबतचे ज्ञान असलेले शासनाने विहित केलेल्या ठिकाणचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतले नसल्यास पुढिल काळात ते घेणे बंधनकारक असणार आहे. अर्जासोबत प्रकल्प अहवाल, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशिल,जातीचा दाखला,रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे. गडचिरोलीच्या कार्यालयाच्या pmmsy.gadchiroli@gmail.com चा इमेलवरती परिपूर्ण अर्ज ईमेल करु शकतात असे आवाहन सहा. आयुक्त, मत्स्यव्यवसाय गडचिरोली यांनी केले आहे. अधिक आणि सविस्तर माहिती साठी गडचिरोली मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या कार्यालयाला संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments