Header Ads Widget

Responsive Advertisement

अविनाश पाटील यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर p10news

                                 


 अविनाश पाटील यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर                                                                                   मुख्य संपादक / पुणे : आदर्श फाउंडेशन, इस्लामपूर याच्या तर्फे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा कलाकारास दिला जाणारा " राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२२" युवा पिढीतील प्रसिद्ध  तबला वादक अविनाश पाटील यांना जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल, पुष्पगुछ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अविनाश पाटील हे संगीत क्षेत्रातील आघाडीचे तबला वादक आहेत. पुणे विद्यापीठाची एम. ए . तबला हि पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव यासह भारतातील अनेक मानाच्या संगीत महोत्सवात सादरीकरण केले आहे. भारतासह दुबई, अबुधाबी, नेदरलँड्स,पोलंड,जर्मनी, डेन्मार्क, स्कॉटलंड, लंडन या ठिकाणी तबला वादन करुन जगभरातील संगीत रसिकांची दाद मिळविली आहे.


हा पुरस्कार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता राजर्षी शाहुस्मारक भवन,द सरा चौक, कोल्हापूर येथे विश्वास मेहंदळे व भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments