Header Ads Widget

Responsive Advertisement

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२१-२२ p10news

 



*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२१-२२*


अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज आमंत्रित



मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)/गडचिरोली,दि.19: अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास,निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी  आवश्यक ती  रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.१३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना ११ वी,१२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रापॅर जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या  विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी/१२ वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग(अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल.दिव्यांग(अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी रहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी,दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली  यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

****

Post a Comment

0 Comments