Header Ads Widget

Responsive Advertisement

सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती अशासकीय सदस्यांची नेमणुक करण्याबाबत प्रस्ताव आंमत्रित p10news

 


मंदीप एम. गोरडवार, मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)
*सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती अशासकीय सदस्यांची नेमणुक करण्याबाबत प्रस्ताव आंमत्रित*


गडचिरोली,(जिमाका)दि.20: दिनांक 4 नोंव्हेबर 2011 या शासननिर्णयानुसार गडचिरोली जिल्हयाकरीता सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून या समितीचे पुर्नगठन करण्याकरीता पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांची नेमणुक करावयाची आहे. 1) स्थानिक महिला संघंटनेचे/संस्थंचे दोन प्रतिनिधी,2) महिलांच्या कायदयासंदर्भात कार्यरत 5 अशासकीय महिला कार्यकर्ते.

सदर समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते. समितीमधील अशासकीय सदस्यांना निधी उपलब्धतेनुसार रुपये 500/- बैठक भत्ता अनुज्ञेय राहिल. तरी इच्छुक नागरिकांनी शैक्षणिक पात्रता  प्रमाणपत्र व संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबाबत अनुभव प्रमाणपत्रासह प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रं.1 कॉम्पलेक्स एरिया येथे 10 जून 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावा.असे  आवाहन सदस्य सचिव सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments