Header Ads Widget

Responsive Advertisement

पावसाळयापूर्वी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार खुले! नदीकाठी गावांनाचा लोकांना सुचना p10news

 


मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)

*पावसाळयापूर्वी चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार खुले.                                        *नदीकाठी गावांनाचा लोकांना सुचना

गडचिरोली/दि.24: वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.दिनांक 15ऑक्टोंबर 2021 पासून सर्व दरवाजे  बंद करण्यात आले होते.यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जुन पासुन सुरु होत आहे बॅरेज मध्ये साठवलेला पाणीसाठा  कमी करुन सर्व 38 दरवाजे 1 जुन 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे.

    त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जिवीत व वित्त हानी होवु नये म्हणून  सर्व लगतचे गावांना/ ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की,त्यांनी आपले गावक-यांना,याबाबत दवंडी व्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात.मार्केडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना,मासेमारी करणारे,रेती घाटातून रेती काढणारे,पशुपालक,नदीतून ये-जा करणारे अशा जनतेने  खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर  यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments